Availability: In Stock

Gubugubu | गुबुगुबू

110.00

Publication Date: 1/9/2010

Pages: 111

Language: Marathi

Description

‘गुबगुबू’ संग्रहातील कथाही सुभाष खैरे ह्यांची हरहुन्नरीपणाची, तळमळीची आणि कसोशीची झेप म्हणावी लागेल.

आज उद्ध्वस्त होत चाललेल्या ग्रामसमाजाचे भेदक चित्रण, शेतकऱ्यांच्या दुःखाचे घुमारे, कथांतील पात्रांची घुसमट, निकटची नातीगोती, त्यांचे रागलोभ, हेवेदावे, पोटाची खळगी भरण्यासाठी शेत पिकावे म्हणून कोरड्या रानात शेतकऱ्यांचा चाललेला आटापिटा; शेत न पिकल्यावर त्यांची होणारी करुण निराशा जणू त्यांना निवडुंगासारखी बोचते. त्यात तेही रक्तबंबाळ होतात. तरीही ते पोट भरण्यासाठी मशागतींवर मशागती करत राहतातच. एवढं घडून त्यांच्या या मेहनतीवर ऋतुचक्राचं लहरी वादळ कोसळतं. त्यात तेही कोसळतात! विंचू चावल्यासारखी दाहकता हरएक कथेतून जाणवते आणि त्यात आपलं हृदय गहिवरून व उचंबळून येतं.

नंदीबैलासह गुबगुबूचा खेळ खेडोपाडी मांडून पोट भरणारा नंदीवाला, त्यांच्या कुटुंबावर आणि नंदीवर बेतलेलं आस्मानी संकट, काळाच्या पडद्याआड होत चाललेला गुबगुबूचा खेळ अनुभवून आपलं अंतःकरण हळहळतं!

कथांच्या लहानग्या जिवात शेतकऱ्यांचे खचून जाणे; उखडून जाणे, खेड्यांमधल्या आजच्या भीषण वास्तवाची आणि ग्रामीण बोलीची पखरण करण्याची लेखकाची किमया आणि हातोटी या कथांचं बलस्थान आहे.

गुबू गुबूत मुलखावेगळा विषय मांडून लेखकाने कथा वाङ्मयात अनोखी भर घातली आहे. या लघुकथा आपल्या काळजाला दीर्घकाळ भिडतील आणि हळुवारपणे त्याला जोजावत राहतील असा विश्वास वाटतो!

 

Additional information

Book Author