Description

‘कथा विविधा’ या प्रस्तुतच्या संग्रहात समकालीन महत्वाच्या कथाकारांच्या लघुकथा संपादित केल्या आहेत.कथा निवडताना प्रामुख्याने महाराष्ट्राच्या सगळ्या प्रदेशांचे अनुभव तिथल्या भाषेसह यावेत असा आग्रह आहे.सर्व प्रदेशांना महत्व देताना कथेने माणसाचे अनुभवविश्व समृद्ध करावे ही अट मात्र आहेच.जीवनाचा विविधलक्षी प्रत्ययकारी,चिंतनात्मक अनुभव या लघुकथा निश्चितच देतात.