Description
दुष्काळाच्या छायेतील जामखेड आणि आष्टीमध्ये असलेलं भालवणी हे आप्पा कोरपे यांचं जन्मगांव जन्म साधारण १९३६चा मधुकर गहिनीनाथ कोरपे पूर्ण नाव. बापाचं वयाच्या पस्तीसाव्या वर्षी बारा वर्षाच्या. मुलीबरोबर साटंलोटं करून झालेलं लग्न. घरात अठराविश्वे दारिद्र्य. कुटुंब एकट्या बापाच्या तुटपुंज्या मजुरीवर चालायचं. तशात कुटुंबात पाच खाणारी तोंडं. भुकेपायी आई मुलांना बुडवून मारायला निघालेली – दोन भावंडे, आणि बापाची दारिद्र्यामुळे झालेली होरपळ व मृत्यू जवळून पाहिलेला – आपली आणि मुलाची भाकरीची सोय व्हावी म्हणून मुलाच्या संमतीने दुसऱ्या नवऱ्याशी गाठ बांधणारी त्यांची आई – ओली बाळंतीण असताना एका लेकराला सोडून गेलेली आई – तेही लेकरू गेल्यावर एकाकी धिटाईने कधी गुरे वळण्याचे, कधी भुसाराचे दुकान चालविण्याचे, कधी एस.टी. स्टॅण्डवर चहाचे हॉटेल चालविण्याचे तर कधी कोंडी खोदण्याचे काम करीत, अहमदनगर येथे येऊन हमाली करणारे श्री. आप्पा कोरपे धडाडीने व प्रामाणिकपणे आज महाराष्ट्र राज्य हमाल मापाडी महामंडळाच्या उपाध्यक्ष पदापर्यंत कसे गेले ते सांगत आहेत “मी तो हमाल” या आपल्या आत्मकथेत.