Description

“तुकोबांनी निर्माण केलेले काव्य साडेतीनशे- पावणेचारशे वर्षांचे अंतर नाहीसे करते. तुकोबांच्या अस्तित्वभानाचा प्रभाव सर्वत्र जाणवत रहातो. ज्ञानदेवांपासून तुकोबांपर्यंत मराठी काव्यपरंपरा अखंड विकसत गेली कारण वारकरी संतकवी जणु हा सबंध काळ, एकमेकांशी संवाद करणारे समकालीनच होते. त्यांच्या काव्याचे ध्वनिप्रतिध्वनी एकमेकांना समृध्द करणारे ठरले. पंढरपूर समृध्द करणारे ठरले. पंढरपूर आणि पांडुरंग हा एक सांस्कृतिक खुंट त्यांनी पकडून ठेवला. वारी ही त्यांची अनंत यात्रा बनली. ऐहिक जीवनाचा अनुभव त्यांनी आपापसात वाटला तो एकच आध्यात्मिक भाषेच्या बहुविध रूपात. मराठीचे असे स्वतंत्र आणि नवीन काव्यप्रकार त्यांनी निर्माण केले जे संस्कृत-प्राकृतात नव्हते आणि इतर देशात किंवा भाषांत नव्हते. आपल्या मौखिक • लोकपरंपरा, आपली दैनंदिन रहाणी, आपले उद्योग व्यवसाय यांच्यातून त्यांनी आपली रूपके, आपली प्रतिमासृष्टी, आपले छंद शास्त्र निर्माण केले. ”