Description
डॉ. महेश केळुसकर यांच्या ‘व्हय महाराजा’ मध्ये जशी मालवणी मुलखातील साक्षात्कारी निसर्गाची आणि प्रेमाची विलोभनीय रुपं पावला- पावलावर भेटत राहतात. तशीच मालवणी तिरकसपणा, भावबंदकी, कोर्ट-कज्जे, जिगरबाजी आणि जगण्या-मरण्याची असोशी दृष्यात्मक होत जाते. प्रादेशिक साहित्यातील ‘व्हय महाराजा’ हा एक महत्त्वाचा टप्पा आहे.
डॉ. महेश केळुसकरानी आपल्या खास ष्टायलीत सांगितलेले ह्ये मालवणी गजाली तुमी वाचता- वाचता आयकत ऱ्हवतालास येळ कसो गेलो, ह्या कळाचा पण नाय.