Description
“मातीत असलेल्या सोन्याचा हा शोध आहे. हे सोनेही अगदी बावनकशी आहे. या सोन्याचा शोध घेणे, ते लोकांसमोर आणणे, त्याचा अर्थ सांगणे हे मौलिक संशोधन कार्य आहे. वाङ्मयीनदृष्ट्या अतिशय सुंदर व अर्थपूर्ण म्हणींचा हा संदर्भकोशच आहे.- ”डॉ. द. ता. भोसले
“जीवनाचे आणि अनुभवाचे सुंदर रेखाटन, मानवी वृत्ती-प्रवृत्ती व स्वभावाचे नेमके दर्शन, समाजदर्शन यांचा सुंदर समन्वय अहिराणी म्हणींमध्ये आहे. चांगली मूल्ये व जीवनानुभव त्यातून प्रकटतात. अहिराणी भाषेला मधुर गोडवा आहे. संस्कृतिसंवर्धनाचे हे काम आहे.” – डॉ. भास्कर शेळके
“अहिराणी म्हणी अतिशय सुंदर व अर्थपूर्ण आहेत. या म्हणी माणसाच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालतात. मातीत दडलेले हे भाषावैभव शोधणे, त्यामागील अनुभव नव्या पिढीसमोर मांडणे ही साहित्याची मोठी सेवा आहे. ” – अभिमन्यू सूर्यवंशी