Description
मिथुनचंद्र चौधरी यांची कविता नुसत्या शब्दांतून बोलत नाही तर शब्दांतल्या अवकाशासह बोलू पाहते. सामाजिक प्रश्नांवरची, नात्यातल्या तरल गाठींवरची वरवरची उकल पुढयात न ठेवता ही कविता आतून वाचकांशी बोलत राहते. या संग्रहात आत्मनिष्ठ आणि समाजनिष्ठ जाणिवेतून जन्मलेल्या कविता आहेत मात्र या दोन निष्ठांमध्ये भेदरेखा नाही. आतली नेणिवेची कवाडं उघडू पाहणारा हा कवी अव्यक्त जाणू पाहणारा आहे; व्यक्त होण्याची सहनशीलता असणारा आहे. मिथुनचंद्र चौधरी यांची समग्र कविता समकालाला जाणत त्यापलीकडचं पाहू इच्छिते, यातच तिचं इमान आहे.
– हेमकिरण पत्की (प्रस्तावनेतून)
Reviews
There are no reviews yet.