Description
गेली चार दशकं कवी म्हणून, मराठीत आपली स्वतंत्र नाममुद्रा अढळ राखणाऱ्या महेश केळुसकर यांचं हे पुस्तक, यात गावाकडच्या वाटा आणि वळणं आहेत, काही तरल आणि काही बिनधास्त प्रवास आहेत, आपल्या अक्षरांची मूळं शोधण्याचा प्रयास आहे आणि मिश्कील उपरोधिक शैलीत केलेली वाङ्मयीन-सांस्कृतिक टीका-टिप्पणी आहे. त्या त्या मूडनुसार इथं शैली बदलत जाते.
१९८२ ते २००७, अशा तब्बल २५ वर्षांच्या काळात वेळोवेळी लिहिलेलं आणि प्रसिद्ध होत राहिलेलं हे वेगळं लेखन. त्याचा ताजेपणा आजही जाणवेल. त्यातील भावसौंदर्य आणि विचार दीप्ती अम्लान आहे. नाही तर २०२५ साली आम्ही हे लेखन कशाला प्रकाशित केलं असतं!







Reviews
There are no reviews yet.