Description
पं. संगीतरत्न ए. पी. नारायणगावकर हे आकाशवाणीचे विशेष श्रेणीचे गायक कलाकार असून, संगीत नियोजकही आहेत. “हिज् मास्टर्स व्हॉइस या सुप्रसिध्द ग्रामोफोन कंपनीत त्यांनी १० वर्षे संगीत दिग्दर्शक या नात्याने काम केले आहे. नंदादीप व मदिरा या संगीत नाटकातून रंगभूमीवर त्यांनी नायकाच्या भूमिका केल्या आहेत व त्या नाटकांना त्यांनी संगीतही दिले आहे. त्याचप्रमाणे ते राष्ट्रीय कीर्तनकारही आहेत. समाजकार्याची आवड असल्याने अनेक संस्थांचे पदाधिकारी म्हणून काम करतात. चेंबूर येथे त्यांची ‘श्रीराम संगीत विद्यालय ही संस्था ४७ वर्षे कार्यरत आहे. संगीतावर व संगीत कलाकारांवर त्यांनी केलेले लेखन अनेक वृत्तपत्रे व मासिकांतून प्रसिध्द झाले आहे. एच. एम्. व्ही कंपनीने काढलेल्या व त्यांनी गायिलेल्या व त्यांच्या संगीत नियोजनाच्या अनेक ध्वनिमुद्रिका लोकप्रिय झाल्या आहेत. तरुण पिढीच्या कलाकारांसाठी त्यापैकी काही गाजलेल्या ध्वनिमुद्रिकांचे स्वरांकन ‘माझ्या चाली’ हे पुस्तक व निवडक लेखांचा संग्रह ‘स्मृति नंदादीप’ हे पुस्तक प्रसिध्द झालेले आहे.







Reviews
There are no reviews yet.