Description

आशा बगे यांच्या या दोन कादंब-यांत नव्या-जुन्या पिढयांतील माणसांचा आयुष्याकडे पाहण्याचा दॄष्टिकोन चितारताना मानवी नातेबंधांची उत्कट रूपे चित्रित होतात-ती जीवनाबद्दलच्या खोल चिंतनशील जाणिवेतून. ’भूमिका’मधले आजी-आजोबा आपल्या मुलीच्या पश्चात तिच्या मुलाला आपल्या संस्करांत वाढवताना, आपल्या सुखदु:खांचा अन्वयार्थ लावत आपले आयुष्य पुन्हापुन्हा नव्याने त्या दु:खासह समजून घेऊ पाहतात. प्रसूतितज्ज्ञ सुरू आणि साधी, संसारी पण संवेदनशील मनाची माधवी यांच्या मैत्रिबंधाची कथा ’उत्सव’मध्ये येते. दोघींच्या वाटयाला आलेल्या एकटेपणाचे रंग वेगळे-पण दोघींच्या मैत्रीतला धागा माणसांना दुभंगून टाकणा-या याच एकटेपणाचा. याच एकटेपणाने आयुष्याकडे समंजसपणे पाहण्याची दाखवलेली प्रगल्भ, स्वयंभू वाट… मानवी जीवनाचे, नातेसंबंधांचे विभ्रम या दोन कादंब-यांतून पुरेशी अलिप्तपणे साकारणारी आशा बगे यांची शैली व्यक्तिरेखांची व्यक्तिमत्त्वे, त्यांच्या आयुष्यासकट वाचकांसमोर जिवंत उभी करत जाते. त्यातले चिंतन वाचकांना विचार करण्याचा अवकाश पुरवत राहते.

Additional information

book-author

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “Bhoomika Ani Utsav | भूमिका आणि उत्सव”

Your email address will not be published. Required fields are marked *