Description

भारत सासणे यांच्या सहा दीर्घकांचा ‘अदृष्ट’ हा संग्रह. मानवी जीवनाच्या असीम रहस्याचा शोध त्यांची दीर्घकथा घेत राहते.

नशीब नावाच्या अमूर्त गोष्टीची विलक्षण परीक्षा ‘जुवाखाना’ या पहिल्याच कथेत अनुभवाला येते… एक एक पूर्ण होत जाणारे उपकथानक आणि उपकथानकांची मिळून विणली जाणारी एक एकसंघ परिपूर्ण दीर्घकथा ‘फिरोज व्हिला’- मानवी समूहाच्या उभ्या-आडव्या छेदांतून-चित्रणांतून मानवी जीवनाचा गूढार्थ विशद करणारी… ‘कशी काळनागिणी’मधे काळाचा प्रवाह ओढून घेऊ लागतो. कुठेतरी-विपरीताकडेही. आतून अवधान असताना काळाचे ओढून नेणेही जाणवते… आणि ‘अंतक’चा अनुभव समग्र मानवी जीवन व्यापून टाकणारा… रूढींच्या निबिड बनातून बाहेर पडू पाहणाऱ्या ‘क्षमा’ या संयत व्यक्तिमत्त्वाच्या स्त्रीचे मनोविश्व ‘ग्रहण’ मधून डोळ्यांपुढे उभे राहते… आणि रहस्यकथेला स्पर्श होऊ न देता गहन अनुभूती देणारी ‘अदृष्ट’ ही दीर्घकथा विलक्षणपणे खिळवून ठेवते…

‘अदृष्ट’ मधल्या दीर्घकथा भारून टाकतात. दीर्घकथेचे स्वतंत्र अस्तित्व ठळक करत जातात.

स्वतःची स्वतंत्र मुद्रा भारत सासणे यांच्या लेखनातून सातत्याने उमटत राहिली आहे. ‘अदृष्ट’ मधे त्याचा प्रत्यय येईल.

Additional information

book-author

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “Adrusht | अदृष्ट”

Your email address will not be published. Required fields are marked *