Description

मी जी कविता लिहिली ती कविता मला कधीच लिहायची नव्हती मी जी कविता लिहीत असते ती कवितासुद्धा मला कधीच लिहायची नसते मी माझा धर्म पाळत नाही माझ्या मनात चाललेल्या भावनिक कोलाहलाशी जी कविता न्याय्य भूमिकेनं वागते त्याच कवितेसाठी बेदखलपात्र असते माझ्या मेंदूत चाललेली वैचारिक उलथापालथ. कविता तिचा धर्म पाळत नाही.

“काहीच बदलत नसतं

भावनिक कोलाहल कागदावर मांडून.”

मी निषेध नोंदवते

माझ्या मन आणि मेंदूशी चाललेल्या

कवितेच्या दुटप्पी धोरणाचा

“कुठे काय बदललं

वैचारिक उलथापालथीच्या नोंदीने तरी ?”

माझ्या निषेधावर तिचा बचावात्मक पवित्रा “काहीच बदलत नसलं तरी पेटवता येऊ शकते काहीतरी बदलण्यासाठीच्या क्रांतीची ठिणगी वैचारिक उलथापालथीच्या नोंदीनं.”

(कवितेतील अंश)

Additional information

book-author

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “Sagalech Rutu Dagabaaj | सगळेच ऋतू दगाबाज”

Your email address will not be published. Required fields are marked *