Description
माणसाच्या भावना कोणत्याही बाहेरील गोष्टीमुळे नाही तर त्या गोष्टीबद्दल केलेल्या स्वतःच्याच विचारांमुळे निर्माण होतात म्हणूनच त्या पूर्णपणे बदलता येतात. त्यासाठी गरज असते स्वतःच्या विचारांची तपासणी करून विवेक जागृत करण्याची !
भीतीच न वाटणं म्हणजे धैर्य नव्हे. वाटलेल्या भीतीवर तोडगा शोधून मात करणं म्हणजे धैर्य !
आलेली कठीण परिस्थिती बदलणं आपल्या हातात नाही पण आहे त्या परिस्थितीशी जुळवून घेणं आपल्या हातात आहे!
वाचन, मनन आणि त्यानुसार वर्तन ही साखळी जपली पाहिजे !
एखादी गोष्ट हवीशी वाटणं ह्यात काही गैर नाही पण हवीशी वाटणारी गोष्ट मिळायलाच पाहिजे असा हट्ट बरा नाही !
माणसात बदल होण्यासाठी सर्वांत आवश्यक गोष्ट म्हणजे तो स्वतः स्वतःत बदल करायला तयार असला पाहिजे. त्याला स्वतःला तो बदल हवाहवासा वाटला पाहिजे. एखादा माणूस कितीही हुशार असला तरी तो दुसऱ्या माणसात बदल घडवून आणू शकतोच असे नाही !
डॉ. अंजली जोशी यांच्या मी अल्बर्ट एलिस या
कादंबरीवर आधारित कादंबरिका






Reviews
There are no reviews yet.