Description

पालकांना मार्गदर्शन करणाऱ्या सर्व प्रकारच्या साहित्यांत भर घालण्यास एक विशेष कारण आहे. ते असे की, हे पुस्तक लेखिकेने विवेकनिष्ठ मानसोपचारशास्त्राच्या दृष्टिकोनातून पालकांना मार्गदर्शन करण्यासाठी लिहिले आहे. या दृष्टिकोनातून लिहिले गेलेले मराठी भाषेतले हे आजपर्यंतचे एकमेव पुस्तक आहे, हे नमूद करणे आवश्यक आहे. डॉ. अल्बर्ट एलिस यांनी जन्म देऊन विकसित केलेल्या विवेकनिष्ठ मानसोपचारशास्त्राच्या अनुषंगाने संशोधन करून लेखिकेने पीएच. डी. ही पदवी संपादन केलेली आहे. परंतु या पुस्तकाद्वारे पालकांना केलेले मार्गदर्शन म्हणजे केवळ पुस्तकी व शुष्क पांडित्याचा आविष्कार नव्हे; तर लेखिकेने स्वतःच्या मुलाचे संगोपनही सतत जागरूक राहून विवेकी पद्धतीने केले आहे. परिणामी त्याचे व्यक्तिमत्त्वही अनेक अंगांनी बहरून आले आहे. त्यामुळे या पुस्तकाच्या मुळाशी लेखिकेच्या विवेकनिष्ठ मानसोपचारशास्त्राच्या ज्ञानाप्रमाणेच अनुभवातून संपादित केलेले व्यावहारिक घडे आहेत, हेही लक्षात घेतले पाहिजे.

कि.मो. फडके (प्रस्तावनेतून)

Additional information

book-author

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “Viveki Palakatwa | विवेकी पालकत्व”

Your email address will not be published. Required fields are marked *