Description

तत्पूर्वी

दासू वैद्य

संस्कृती हरवली की

मजा येते

म्हणजे तिला खोदकाम करून

शोधता येतं,

शतकानुशतकं खेळता येतो

संस्कृती शोधण्याचा खेळ,

सापडलेल्या संस्कृतीचे

वर्णन वाचताना

चित्र पाहताना

अजून काही शतकांची होते

शतपावली,

आम्ही पुरतो मातीत

गरज म्हणून बिया

आणि छंद म्हणून संस्कृती

आम्हाला आवडतं

पुन्हा पुन्हा आदिम व्हायला.

Additional information

book-author

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “Tatpoorvi | तत्पूर्वी”

Your email address will not be published. Required fields are marked *