Description
मानवी जीवनानुभवांच्या, त्याच्या भौतिक, आर्थिक, सामाजिक स्थितीत होणाऱ्या स्थित्यंतरानुसार मानवाच्या जाणीव आणि संवेदनशीलतेत परिवर्तन होत असते. त्याचप्रमाणे मानवी जाणीव, संवेदनशीलता आपल्या विविध मानवी उपक्रमातून आपल्या सभोवतालच्या परिस्थितीस इष्ट ते वळण लावण्याचा प्रयत्न करीत असताना अभिव्यक्त होत असते. आधुनिक मराठी कवितेच्या इतिहासात जी विविध वळणे दिसतात ती त्या काळातील जगण्याच्या स्थितीला कवींनी दिलेल्या साद-प्रतिसादातून निर्माण झालेली आहेत.