Description
श्री. दत्तात्रय यशवंत चितळकर बी.एस्सी.बी.एड्. (माध्यमिक शिक्षक, प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्था, प्रवरानगर)
विश्वातील प्रत्येक मानव आपले जीवन सुखी व समृध्द करण्यासाठी कधी विज्ञानाचा तर कधी अध्यात्माचा सूक्ष्म अनुभव घेऊ पाहत आहे, परंतू त्यांची रहस्य त्याला न उलगडल्या मुळे तो अस्थिर झाला असुन त्याच्या मनात व्दैत निर्माण झाले आहे. हे व्दैत घालवून अव्दैताकडे वाटचाल करण्याचा, मानवी जीवनाच्या कल्याणाचा आणि विश्वशांतीकडे नेऊ पाहाणारा हा एक लहानसा कवडसा संस्कार मूल्यांच्या माध्यमातून समोर ठेवत आहे. अध्यात्म व विज्ञान या एकाच नाण्याच्या दोन बाजू असल्या तरी त्यांचे साध्य व मूळ गाभा एकच असून त्यातील सत्यता, वास्तवता, रहस्य, परस्पर संबंध व उपयुक्तता या सर्वांचा परिचय व उकल करुन देणारे अध्यात्म, विज्ञान आणि संस्कार मूल्ये हे पुस्तक आपणास योग्य मार्गदर्शक ठरेल.