Description

एक वजा क्षण

ही कथा वयाला समजून घेणारी आहे. वयाला शहाणा स्पर्श झाला की प्रसंग म्हणजे नियती नव्हे हे नवे भान त्याला येते. वेदनेच्या प्रदेशात भटकूनही वय तटस्थ राहतं, असुरक्षिततेला सामोरं जातं, उन्मळून पडले तरी उमलण्याचा प्रवास करायला उत्सुक असलेल्या वयाची ही कथा आहे. ही नात्याचीही कहाणी आहे. नात्याला एक देह असतो, आणि त्या देहाला ‘ओली माती तिच्या हजार गती’; या अशाश्वततेचा संसर्ग असतो. ते बरेचदा नासतं, लोपतं, तसं कोपतंही. ते कुरुप आणि विद्रुप बनतं. नात्याचं निरंतरपण जाणवूनही ते दिर्घायु व्हावं, किंवा अल्पायुषी ठरावं असं माणसाला वाटतं. या कथांमधील माणसं एकटेपणाच्या सावलीचा शोध घेत राहतात. या शोधाची स्वतःच्या ओळखीशी निगडीत प्रश्नांची ही कथा. ती तरुण आहे. शैलीचा सोस तिला नाही. व्यक्त न होऊ शकणारा एक वजा क्षण समजूतीने सांगताना व्यक्तीमनाच्या विश्लेषणातून उलगडत जाणारी ही कथा…..

Additional information

book-author