Bhau Padhye | भाऊ पाध्ये

Bhau Padhye | भाऊ पाध्ये

प्रभाकर नारायण पाध्ये ऊर्फ भाऊ पाध्ये (Bhau Padhye) (नोव्हेंबर २६, १९२६ – ऑक्टोबर ३०, १९९६) हे मराठी कादंबरीकार, कामगार चळवळकर्ते होते. पाध्यांचा जन्म नोव्हेंबर २६, १९२६ रोजी मुंबईतील दादर येथे झाला. १९४८ साली मुंबई विद्यापीठातून अर्थशास्त्र या विषयात पदवी संपादन केली. पदवी संपादन केल्यानंतर काही काळ (१९४९-५१) त्यांनी कामगार चळवळीत कार्यकर्ता म्हणून काम केले. त्यानंतर तीन वर्षॅं ते माध्यमिक शाळेत शिक्षकाचे काम करत होते. नंतर वडाळ्यातील स्प्रिंग मिल येथे चार वर्षॅं व एलआयसीत चार महिने त्यांनी कारकुनी केली. १९५६ मध्ये शोशन्ना माझगांवकर या कामगार चळवळीतील कार्यकर्तीशी त्यांचा विवाह झाला. काही काळ त्यांनी ‘हिंद मझदूर’, ‘नवाकाळ'(१ वर्ष) व ‘नवशक्ती'(१० वर्षं) या वृत्तपत्रांमधून पत्रकारिता केली.

माहिती सौजन्य: Wikipedia

 

Books By Bhau Padhye | भाऊ पाध्ये