या पुस्तकाविषयी
'जगातील कुष्ठरोग्यांच्या कल्याणा काया, वाचा, मने कष्टविणाऱ्या एका समाजसेवकाची - समाजदूताची ही विलक्षण कहाणी. पित्यानं जागेपणी पाहिलेल्या एका स्वप्नाचा पाठपुरावा या सुपुत्रानेही तितक्याच आत्मीयतेनं केला. पित्यानं ते स्वप्न सत्यात उतरवलं आणि या मुलानं त्या सत्यात उतरलेल्या स्वप्नाला नवयुगाचे आयाम दिले. त्यासाठी घेतलेल्या परिश्रमांची केलेल्या शारीरिक आणि मानसिक कष्टांची ही सत्यकथा. जेव्हा श्रेयस-प्रेयसाची वेळ आली, तेव्हा स्वतः कडे ते न घेता या समाजसेवकाने आपल्या जिवाभावाच्या सहकाऱ्यांकडे ते सोपवून दिलं. हल्ली असं फार क्वचित घडतं नाही का ?... आणि म्हणूनच डॉ. विकास बाबा आमटे खऱ्या अर्थानं थोर आहेत. प्रसिद्धीचा प्ररवर झोत थोपवून पराङ्मुखतेच्या मंद तिरिपेत राहण्यात ते यशस्वी झाले आहेत. कुठलाही पुरस्कार स्वीकारायला जायला नको म्हणणारे, प्रसिद्धीपेक्षा सिद्धीवर निष्ठा असणारे, जगप्रवासापेक्षा आनंदवनाचा 'सहवास' प्रिय असणारे विकास आमटे यांची ही प्रेरणादायी कहाणी.
पुस्तकाची छायाचित्रे
लेखकाविषयी
अभिप्राय आणि मानांकन
अजून अभिप्राय नाही — या पुस्तकाबद्दल तुमचे मत नोंदवणारे पहिले व्हा.
अभिप्राय लिहिण्यासाठी साइन इन कराइथे अजून काही लिहिलेले नाही.