About this book
या पुस्तकाविषयी
प्रिय भ. मा. परसवाळे,
तुमच्या कवितेमधून समाजस्थितीचे उपरोधिक, विदारक परंतु तरीही संयत रूपातून जे दर्शन घडते तो प्रवासच मुळी व्यक्तीकडून समष्टीकडे जाणाऱ्या संघर्षमय रणभूमीचा आहे. म्हणूनच त्यात सर्जनशक्तीचे टवटवीत सामर्थ्य अंकुरले आहे. हा प्रवास खोट्या युद्धाचा आणि प्रचारी घोषणांचा आव न आणताही करता येतो हे तुमच्या कवितेने सिद्ध केले आहे. तिच्यातील समृद्ध कलामूल्यांचा हाच आधार आहे असे मला वाटते.
...तुमचे काव्यांतर्गत कन्फेशन मला अतिशय बेचैन करते, कारण ते केवळ तुमचेच कन्फेशन नाही; तर ते माझेही आहे आणि संवेदना शिल्लक असणाऱ्या कोणत्याही माणसाचे असू शकते. हे कन्फेशन ही साधी गोष्ट नाही. त्यासाठी स्वतःच स्वतःशी केलेला संघर्ष आणि त्यातून घेतलेला आत्मशोध या सर्वांची त्याला विशाल पार्श्वभूमी आहे. असा हा कन्फेशन देणारा नितळ माणूस तुमच्या कवितासंग्रहाच्या पानापानावर आढळतो.
- रावसाहेब कसबे
(पत्रातून)
Book images
पुस्तकाची छायाचित्रे
Reviews & ratings
अभिप्राय आणि मानांकन
अजून अभिप्राय नाही — या पुस्तकाबद्दल तुमचे मत नोंदवणारे पहिले व्हा.
अभिप्राय लिहिण्यासाठी साइन इन कराइथे अजून काही लिहिलेले नाही.
You may also like
सर्व पुस्तकं