या पुस्तकाविषयी
फाल्गुन शुद्ध पंचमीपासून ते पाडव्यापर्यंत शिग्माखेळ कोकणात मावीत समाजाच्या मांडावर घुमट वाद्य वाजवून, फागगीते गाऊन सादर केला जातो. या गीतामधून गाबीत समाजाच्या लोकसंस्कृतीचे दर्शन घडते. ही फागगीते लय, ताल, नृत्याशी बांधलेली आहेत. 'गाबीत समाज आणि फागगीते' या ग्रंथात फागाच्या शेवटी समर्पक अर्थ आणि त्याचे विश्लेषण केल्यामुळे ते समजण्यास सोपे जातील याची खात्री वाटते. फागगीते, फागनाट्य यामधून गाबीत समाजाच्या लोकसंस्कृतीचे दर्शन घडते.
गाबीत समाजावर वारकरी संप्रदायाच्या अद्वैत् तत्वज्ञानाचा प्रभाव आहे हे फागगीतांतून अधोरेखीत झालेले दिसते. कोणत्याही अभ्यासविषयाची सैद्धान्तिक पार्श्वभूमी यथोचित समजून घेणे महत्त्वाचे असते हे लक्षात घेऊन डॉ. सारंग व डॉ. सामंत यांनी फागसाहित्य विषयक विविध संकल्पनांची मांडणी या पुस्तकात केली आहे. त्यामुळे वाचकांना गाबीत समाज आणि फागगीते या संकल्पनेची नेमकी जाण येऊ शकेल.
लोकसाहित्याच्या विद्यार्थी-अभ्यासकांसोबत जाणकार अभ्यासकही या पुस्तकाचे स्वागत करतील असा विश्वास वाटतो.
पुस्तकाची छायाचित्रे
अभिप्राय आणि मानांकन
अजून अभिप्राय नाही — या पुस्तकाबद्दल तुमचे मत नोंदवणारे पहिले व्हा.
अभिप्राय लिहिण्यासाठी साइन इन कराइथे अजून काही लिहिलेले नाही.