या पुस्तकाविषयी
सर्वसामान्य माणूस पैसे कमावण्यासाठी कमालीची धडपड करतो; पण ते गुंतवताना मात्र फारसा विचार करत नाही. ऐकीव गोष्टी, अर्धवट माहिती, सातत्यानं आदळणाऱ्या बातम्या यांच्यामुळे तो पार गोंधळून जातो. परंपरांनुसार चालत आलेल्या 'सुरक्षित' गुंतवणूक योजनांमध्येच तो पैसे गुंतवतो. कधीकधी इतरांच्या सांगण्यावरून किंवा धिटाईनं तो शेअरबाजार किंवा म्युच्युअल फंड योजना यांच्यामध्ये पैसे गुंतवण्याचं धाडस करतोही; पण नेमकं चुकीच्या वेळेला पैसे गुंतवणं आणि आणखी चुकीच्या वेळी ते काढून घेणं यामुळे त्याला जबरदस्त फटका बसतो आणि नव्यानं अशी गुंतवणूक करायचं तो एकदम टाळतो. या सगळ्याला तो 'जुगार' म्हणायला लागतो आणि विनाकारणच आपलं नुकसान करून घेतो. खरं म्हणजे अगदी मोजकी मूलभूत सूत्रं लक्षात घेतली आणि आपल्या मानसिकतेकडे बारकाईनं लक्ष दिलं, तर कुठल्याही माणसाला आपल्या गुंतवणुकीतून खात्रीलायकरीत्या भरघोस नफा कमावणं सहजपणे शक्य आहे. म्हणूनच 'गुंतवणूकदारांची मानसिकता' हा विषय अत्यंत महत्त्वाचा आणि प्रत्येक माणसाच्या जिव्हाळ्याचा आहे. भारतामध्ये त्याविषयी फारसं बोललं जात नसल्यामुळे तो नीटपणे समजून घेणं आणि आचरणात आणणं सगळ्यांच्या दृष्टीनं अत्यावश्यक आहे. यासाठीच हे पुस्तक !
पुस्तकाची छायाचित्रे
लेखकाविषयी
अतुल कहाते यांची पुस्तके
अभिप्राय आणि मानांकन
अजून अभिप्राय नाही — या पुस्तकाबद्दल तुमचे मत नोंदवणारे पहिले व्हा.
अभिप्राय लिहिण्यासाठी साइन इन कराइथे अजून काही लिहिलेले नाही.