या पुस्तकाविषयी
'तुला माहितीय... लोक काय म्हणतील? हा आपल्याच मनातला प्रश्न असतो. आणि त्याचं उत्तरही आपलंच असतं. लोक काहीच म्हणत नाहीत. कारण लोकांना चेहरा नसतो. कणाही नसतो. आपणच आधार देऊन उभं करतो त्यांना. नुसता बागुलबुवा...' - ती'ची गोष्ट 'जो तो आपला प्रश्न आपल्या परीने सोडवत असतो. तो प्रश्न 'त्याचा' असतो. त्यामुळे चूक की बरोबर हे ठरवायचा अधिकार त्याचाच! मला तुला सांगायचं वेगळंच आहे. दुसऱ्याचे प्रश्न आणि त्याची पद्धत पाहून आपण घाबरायचं नसतं. प्रश्न उभे राहतील म्हणून घाबरून ती वाटच बंद करायची नसते.' - कॅनव्हास शेवटी मनुष्य हा अनाकलनीयच. श्रावणबाळाचे गोडवे गाणाऱ्या आपल्या देशातही एखादा करंटा जन्मदात्रीला जिवंतपणी थेट सरणावर पोहोचवतो. आणि जिथे नात्यांचा पालापाचोळा भोग-विलासाच्या बादळात उधळत राहतो तिथे, मार्थासारखी एखादी छोटीशी पणती, नात्यांचे बंध जपण्याचा आटोकाट प्रयत्न करते. स्वतःच्या मनात जिवंत ठेवते. - मार्थाची 'कहाणी' 'माझ्या या देहापलीकडे एक मन आहे... जे या अत्याचारांनी जास्त जखमी होणार आहे, हे जाणवलं नाही त्यांना? आजवरची मैत्री आठवली नाही? आणि वयात आलेल्या मुलीने कसं बागावं... जपावं... सांभाळावं... हे येता-जाता सांगणाऱ्यांनी या मुलांना का काही शिकवलं नाही? फक्त वेगळा देह... आकार. पण अखेर 'माणूस'च आहोत आम्ही, हे का नाही समजावलं त्यांना?' - आर्त नात्यांमधील भावनिक आंदोलने... निखळ प्रेम, असूया, स्पर्धा... आणि उघडे वास्तव यांचा हा 'कोलाज!'
पुस्तकाची छायाचित्रे
लेखकाविषयी
अभिप्राय आणि मानांकन
अजून अभिप्राय नाही — या पुस्तकाबद्दल तुमचे मत नोंदवणारे पहिले व्हा.
अभिप्राय लिहिण्यासाठी साइन इन कराइथे अजून काही लिहिलेले नाही.