या पुस्तकाविषयी
दुःख सहन करणं वाटतं तितकं सोपं नसलं, तरीही अवघडाशी दोन हात करणं या रणात पुन्हा एकदा दुःख पाठीशी असतं, हा आधार ज्याच्या-त्याच्या इतिहासातून प्रत्येकालाच मूळ कागदपत्राप्रमाणं फार जपावा लागतो. जगणं हे जिवाला नवीन नसलं तरी जगण्याच्या लढाईत जिवाला मागे हटता येत नाही.
जगणं हे असं एक युद्ध आहे, की जिथून पराभवानंतर पाय मागे घेण्याची सोय असूनही इच्छा बाळगता येत नाही. युद्धासारखं जगणं असो, की जगण्यातलं प्रत्येक प्रहराचं दुःख असो, आयुष्य अंगणाशी जोडूनच ठेवावं लागतं.
कोणाच्या वाट्याला कोणत्या घराचं अंगण येईल, याची पायांनाही कल्पना नसते. म्हणूनच प्राक्तनाच्या पायवाटेवरून प्रवास करताना पाय प्राणाशी पहाटेनं जोडून घ्यावे लागतात.
अंधारयात्रेच्या प्रवासातला तो क्षण म्हणजेही प्राणाचीच पताका असते. या अशा सर्व संवेदनांचं हे लेखन जणू जगण्याला फडकावत, जगाला धक्का देणारं ध्वजारोहणच आहे. स्वातंत्र्याच्या दोरीला जोडलेले आणि वाऱ्यालाही न जुमानणारे ध्वज मुहूर्तापुरतेच मेढीवर असतात ही शोकांतिका कुणी कुणाला, केव्हा, कशी, कुठे सांगायची हा जरी मुख्यतः स्त्रियांच्या सोसण्याचा भाग असला, तरी एका मराठा मुलीनं साहस दाखवलं आणि ध्वजारोहण केलं; तीच ही मराठा मुलगी !
पुस्तकाची छायाचित्रे
लेखकाविषयी
अभिप्राय आणि मानांकन
अजून अभिप्राय नाही — या पुस्तकाबद्दल तुमचे मत नोंदवणारे पहिले व्हा.
अभिप्राय लिहिण्यासाठी साइन इन कराइथे अजून काही लिहिलेले नाही.