arrow_back Back to Books
मुक्काम

मुक्काम

Mukkam

लेखक Gauri Deshpande
storefront Mouj Prakashan Gruh
₹230
incl. all taxes
Only 1 left
place
local_shipping Free shipping over ₹500 verified_user Secure payment via Razorpay assignment_return 7-day return window

About This Book

"... बहुतांश लोकांनी ठरावीक मागनि वाटचाल करण्यात ज्यांचे भले असते अशांनी आखून दिलेल्या मागनि आपण आजवर का चालत आलो? आणि तेही त्याच्यात आपले फारसे भले दिसत नसताना? कुठलेही प्रश्न न विचारता पुढे जाणाऱ्या आळशी अथवा अंध अथवा हतबल अथवा प्रवाहपतित जनांच्या ओघामागून आपण पावलापुढे पाऊल का टाकत राहिलो? काही रूढ कौटुंबिक वा सामाजिक संकेतांत ज्यांचे हितसंबंध गुंतले आहेत त्यांची हुकूमशाही का सहन करत आलो?..." - हे प्रश्न अखंड आणि कर्कशपणे मनात निनादत असलेली कालिंदी, आजवर मुकाट काटली त्याव्यतिरिक्त दुसरी बाट शोधण्यासाठीं शारीरिक आणि भौगोलिक दृष्ट्या चाकोरीबाहेर पडते. तथाकथित नैतिकतेला, नातेसंकेतांना धक्के देत, जीवनाच्या मुक्त, प्राकृतिक लयीशी लय साधत, भल्याबुऱ्या अनुभवांना, खेदखंतींना सहज सामोरे जात, स्त्रीपुरुषसंबंधाचे नवनवे पैलू उलगडत-आकळत, मुंबई-तळेगाव-ग्रीस असा 'प्रवास' करून परतते आणि आपले मुक्कामस्थळ पक्के करते. कालिंदीच्या या 'मुक्कामा'ला केवळ शारीरिक वास्तव्याचा संदर्भ नसून, वाहत्या-उसळत्या जीवनाला सदैव सन्मुख राहण्याच्या तिच्या 'स्वावलंबी', निकोप जीवनदृष्टीचा आहे! गौरी देशपांडे आपल्या कादंबऱ्यांतून ज्या मुक्त पण विशुद्ध जीवनपद्धतीचा सातत्याने शोध घेत आहेत, त्या त्यांच्या अखंड वाटचालीतीलच हा एक 'मुक्काम'!

Book Images

About the Author

person

Gauri Deshpande

View Full Profile arrow_forward

Reviews & Ratings

No reviews yet — be the first to share what you thought of this book.

rate_review Sign in to write a review
rate_review

You May Also Like