सन्मानRecognition १ मिनिटांचे वाचन 1 min read

शब्दालयासाठी अभिमानाचा क्षण! A Proud Moment of Recognition for Shabdalaya

शब्दालय प्रकाशित डॉ. दिलीप धोंडगे यांच्या ‘सांगनं नही पण सांगनं वन’ या साहित्यकृतीचा राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० (NEP 2020) अंतर्गत शैक्षणिक वर्ष २०२५–२६ पासून शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, जळगाव येथील बहुविद्याशाखीय मायनर (MDM) अभ्यासक्रमात समावेश करण्यात आला आहे.

Shabdalaya’s published literary work Sangan Nahi Pan Sangan Van by Dr. Dilip Dhondge has been included in the undergraduate curriculum under the Multidisciplinary Minor (MDM) programme, in accordance with the National Education Policy (NEP) 2020, from the academic year 2025–26.

शब्दालय प्रकाशनासाठी ही अत्यंत अभिमानाची आणि आनंदाची बाब आहे. शब्दालय प्रकाशित डॉ. दिलीप धोंडगे यांच्या ‘सांगनं नही पण सांगनं वन’ या साहित्यकृतीचा शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, जळगाव येथील अभ्यासक्रमात समावेश करण्यात आला आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० (NEP 2020) अंतर्गत बहुविद्याशाखीय मायनर (Multidisciplinary Minor – MDM) कार्यक्रमासाठी या साहित्यकृतीची निवड करण्यात आली आहे.

ही साहित्यकृती RLM302N – अहिराणी: ललित साहित्य या अभ्यासक्रमासाठी TY–VI Semester मध्ये निर्धारित करण्यात आली असून, पुढील अभ्यासक्रम पुनर्रचनेपर्यंत तिचा समावेश कायम राहणार आहे.

प्रादेशिक भाषांमधील साहित्याला शैक्षणिक क्षेत्रात मिळालेली ही मान्यता महत्त्वपूर्ण आहे. विशेषतः अहिराणी भाषेतील साहित्यकृतीला अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या अभ्यासक्रमात स्थान मिळणे, ही अहिराणी साहित्यविश्वासाठी आणि शब्दालयासाठी गौरवास्पद बाब आहे.

प्रादेशिक भाषा, लोकसंस्कृती आणि साहित्यिक परंपरा जतन करण्यासाठी व त्यांना नव्या वाचकांपर्यंत पोहोचवण्यासाठी शब्दालय सातत्याने कार्यरत आहे. या मान्यतेमुळे शब्दालयाच्या साहित्यिक योगदानाला नवी प्रतिष्ठा प्राप्त झाली असून, प्रादेशिक साहित्याच्या शैक्षणिक महत्त्वावरही शिक्कामोर्तब झाले आहे.

Shabdalaya takes immense pride in celebrating this academic recognition of its published literary work, Sangan Nahi Pan Sangan Van, authored by Dr. Dilip Dhondge. The Principal of Government College of Engineering, Jalgaon, Dr. Suhas Sudhakarrao Gajare, formally acknowledged the inclusion of this work in the college curriculum under the Multidisciplinary Minor (MDM) programme, in accordance with NEP 2020.

The work has been prescribed for the course RLM302N – Ahirani: Lalit Sahitya for TY–VI Semester, effective from the academic year 2025–26 until the next curriculum revision.

This recognition is a proud milestone for Shabdalaya and highlights the academic relevance of regional-language literature, particularly Ahirani literary writing. It reinforces Shabdalaya’s commitment to publishing meaningful literary works that preserve linguistic heritage, enrich literary scholarship, and reach new generations of readers.

शेअर कराShare

या घडामोडीतील पुस्तकेBooks in this story

संबंधित व्यक्तीPeople

संबंधित घडामोडीRelated stories

सन्मान Recognition

शब्दालयासाठी अभिमानाचा क्षण! ‘तुकाराम – अहिराणीत निरूपण’चा अभ्यासक्रमात समावेश

शब्दालय प्रकाशन प्रकाशित प्रा. डॉ. एस. के. पाटील यांच्या ‘तुकाराम – अहिराणीत निरूपण’ या साहित्यकृतीचा राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० (NEP 2020) अंतर्गत…

A Proud Moment for Shabdalaya: Tukaram – Ahiranit Nirupan Included in the College Curriculum

Shabdalaya celebrates the academic recognition of Tukaram – Ahiranit Nirupan, authored by Prof. Dr. S. K. Patil and published by Shabdalaya…

Government College of Engineering, Jalgaon, Maharashtra

सन्मान Recognition

‘कथाबंध’ — मराठी कथासाहित्याचा व्यापक वेध घेणारे पुस्तक मुंबई विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात समाविष्ट

मराठी कथासाहित्याच्या प्रवाहांचा वेध घेणारे ‘कथाबंध’ हे संपादित पुस्तक मुंबई विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात समाविष्ट.

‘Kathabandh’ Included in the University of Mumbai Curriculum

‘Kathabandh’, an edited survey of the streams of the Marathi short story, has been placed on the University of Mumbai syllabus.

University of Mumbai

सन्मान Recognition

‘कोपात’ — रेमंड मचाडो यांची कादंबरी मुंबई विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात समाविष्ट

रेमंड मचाडो यांची वसईची संस्कृती आणि धार्मिक सहजीवनाचे चित्रण करणारी ‘कोपात’ मुंबई विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात समाविष्ट.

‘Kopat’ by Raymond Machado Included in the University of Mumbai Curriculum

Raymond Machado’s ‘Kopat’, a novel of Vasai’s culture and religious coexistence, has been placed on the University of Mumbai syllabus.

University of Mumbai

सर्व पुरस्कार व सन्मानAll Achievements & Honours पुस्तके पाहाBrowse the books