Lekhakacha Mrityu Aani Itar Goshti

See more images

Lekhakacha Mrityu Aani Itar Goshti

लेखकाचा मृत्यू आणि इतर गोष्टी

Publisher
Shabd Publication
Language
Marathi

₹250

incl. all taxes

Only 1 left

  • Free shipping over ₹500
  • Secure online payment by UPI, card or netbanking
  • 7-day return window
या पुस्तकाविषयी

About this book

जयंत पवार हे मराठी कथेला मुक्ततेचा आशय देऊन अधिक खुलेपण देणारे महत्त्वाचे कथाकार आहेत. आधुनिक मराठी कथाबदलाचा हा वळणटप्पा आहे. कथा या प्रकाराच्या अनेक शक्यतामिती निर्माण करून त्यांनी मराठी कथेला नवी परिमाणे प्राप्त करून दिली आहेत. 'लेखकाचा मृत्यू आणि इतर गोष्टी 'मधून त्यांनी लघुकथा आणि कथा यांच्या सीमारेषा धूसर करणारा नवाच रूपबंध घडवला आहे. या लेखनातील कथनसहजता गोष्टीच्या जवळ जाते. अभावग्रस्त मानवी जगण्याच्या लेखकीय संवेदनशीलतेतून या कथांचे आशयद्रव्य आकारले आहे. संदिग्ध आणि सापेक्ष वास्तवाच्या अर्थनिर्णयाच्या दिशा भूत आणि भविष्याने निर्धारित कल्पिताने उजागर केल्या आहेत. व्यवस्थेचा उपहास आणि सामान्यांच्या यातनापूर्ण हतबलतेला एकाच वेळी कवेत घेण्याची विलक्षण कलात्मकता त्यांना साधली आहे. तळातल्या माणसाच्या भावजीवनाचे तळकोपरे धुंडाळत पशू-पक्षी, एकूणच जीवसृष्टीच्या संदर्भात मानवी जीवनाचा विचार होऊ शकतो, तोच मानवी अस्तित्वाचा आधार आहे. या जाणिवेमुळे ह्या कथा जगभरातल्या मानवजातीच्या होऊन जातात. जयंत पवार यांनी लिखित कथेला गोष्टीच्या जवळ आणून तिला खऱ्या अर्थाने तिचं हरवलेलं भारतीयत्व बहाल केलं आहे. - दत्ता घोलप
पुस्तकाची छायाचित्रे

Book images

लेखकाविषयी

About the author

Jayant Pawar

जयंत पवार | Jayant Pawar

View Full Profile
जयंत पवार यांची पुस्तके

More by Jayant Pawar

View all
अभिप्राय आणि मानांकन

Reviews & ratings

No reviews yet — be the first to share what you thought of this book.

Nothing written here yet.

हे देखील पाहा