Saturday Night Fever

See more images

Saturday Night Fever

सॅटर्डे नाईट फिव्हर

Publisher
Shabdalaya Prakashan
Published
2023
Pages
238
ISBN
9788119258581
Language
Marathi

₹420

incl. all taxes

Only 2 left

  • Free shipping over ₹500
  • Secure online payment by UPI, card or netbanking
  • 7-day return window
या पुस्तकाविषयी

About this book

मराठी कथा साहित्याचा अभ्यास केल्यास लक्षात येतं की महानगरी संवेदना लिहिणारे कथाकार तुलनेत कमी आहेत. याचे एक कारण असे की महानगरी संवेदना कथेत आणताना मुळातच रुक्ष असलेले कथाविषय, कथाप्रदेश आणि कथापात्रे कथेत त्यांची त्यांची रुक्ष आणि असंवेदनशील वृत्ती घेऊन येतात त्यामुळे कथा अधिकच कोरडी होण्याची, वाटण्याची शक्यता दाटते. महानगरी जगणेच मुळात विस्कळीत आहे. तो अव्याहत विस्कळीतपणा, निर्दयी वेग, स्थलकालाचे जीर्ण तुकडे, आणि माणसाचे रोज दररोज नव्याने तुकड्यातुकड्यात होणारे खच्चीकरण अवमूल्यनाने कथेचा आवेग आणि परिप्रेक्ष्य इतका वाढतो की आकलनस्तरावर महानगरी कथा विस्कळीत वाटण्याचा धोका संभवतो. हे सर्व संभाव्य धोके टाळून उदय कुलकर्णी यांची प्रत्येक कथा समकालातील जगण्याचे पेच मांडत वाचकांच्या मनावर पकड घेते ही बाब मला महत्त्वाची वाटते. उदय कुलकर्णी हे साहित्यासोबत, नाटक आणि चित्रपट यांतही अभ्यासपूर्ण रुची घेतात. त्यामुळेच त्यांच्या कथांमध्ये दृश्यात्मकता जाणवते. महानगरी कथेचे वास्तव मांडताना जो तटस्थपणा लागतो, आणि समोर आलेले निष्कर्ष निडरपणे कागदावर मांडण्यास जी निर्भीड वृती लागते ती उदय कुलकर्णी यांचेकडे आहे. त्यांची कथा असामाजिकतेवर नुसते भाष्य करीत नाही तर प्रश्न विचारण्याची धमक ठेवते. अशा थेट भाष्य करणाऱ्या कथा आणि कथाकार ही आजच्या काळाची गरज आहे. सूक्ष्मदर्शी भिंगातून महानगरी जगणे दाखवणारे नवे कथाकार उदय कुलकर्णी यांचे वाचक स्वागत करतील हे निश्चित. - किरण येले
पुस्तकाची छायाचित्रे

Book images

लेखकाविषयी

About the author

उदय कुलकर्णी | Uday Kulkarni

View Full Profile
उदय कुलकर्णी यांची पुस्तके

More by Uday Kulkarni

View all
अभिप्राय आणि मानांकन

Reviews & ratings

No reviews yet — be the first to share what you thought of this book.

Nothing written here yet.

हे देखील पाहा