उपक्रमActivity २ मिनिटांचे वाचन 2 min read

‘नव्वदोत्तरी नाटक : आशय आणि रूप’ — साहित्य अकादमी व शब्दालय प्रकाशनचा दोन दिवसीय नाट्यपरिसंवाद ‘Post-1990 Marathi Theatre: Content and Form’: A Two-Day Symposium with Sahitya Akademi

साहित्य अकादमी आणि शब्दालय प्रकाशन यांच्या संयुक्त विद्यमाने १ व २ जुलै २०२२ रोजी श्रीरामपूर येथे नव्वदोत्तरी मराठी नाटकावर दोन दिवसीय नाट्यपरिसंवाद; उद्घाटन सतीश आळेकर, अध्यक्ष रंगनाथ पठारे.

Sahitya Akademi and Shabdalaya Prakashan brought playwrights and critics to Shrirampur on 1 and 2 July 2022 to examine three decades of change in Marathi theatre; Satish Alekar inaugurated, Ranganath Pathare presided.

मराठी English

साहित्य अकादमी आणि शब्दालय प्रकाशन यांच्या संयुक्त विद्यमाने 1 व 2 जुलै 2022 रोजी श्रीरामपूर येथे ‘नव्वदोत्तरी नाटक : आशय आणि रूप’ या विषयावर दोन दिवसीय नाट्यपरिसंवाद आयोजित करण्यात आला. गेल्या तीन दशकांतील जागतिकीकरण, उदारीकरण, खाजगीकरण, बदलती कुटुंबव्यवस्था, सामाजिक-राजकीय उलथापालथ आणि व्यक्तीकेंद्री जीवनशैली यांचा मराठी नाटकाच्या आशय, रूप आणि सादरीकरणावर झालेला परिणाम हा या परिसंवादाचा केंद्रबिंदू होता.

या कार्यक्रमाचे उद्घाटन ज्येष्ठ नाटककार सतीश आळेकर यांच्या हस्ते झाले, तर अध्यक्षस्थानी ज्येष्ठ साहित्यिक व साहित्य अकादमीच्या मराठी सल्लागार मंडळाचे संयोजक रंगनाथ पठारे होते. प्रसिद्ध लेखक व अभ्यासक दत्ता भगत यांच्या बीजभाषणाने परिसंवादाला वैचारिक दिशा मिळाली. राजन गवस, सुमती लांडे, प्रेमानंद गज्वी, नीळकंठ कदम, स्वागत थोरात, सचिन शिंदे, प्रवीण भोळे, रमेश भोळे, गिरीश पतके, प्रवीण काळोखे, प्राजक्त देशमुख, प्रतिक पुरी, रमेश रावळकर आणि दत्ता पाटील अशा अनेक मान्यवरांनी विविध सत्रांत सहभाग घेतला.

परिसंवादात नव्वदोत्तरी नाटकाचे सादरीकरण, बदलते आशय व भूमिका, नाट्यभान, मराठी नाट्यपरंपरा आणि नव्वदोत्तर मराठी नाटक यांवर सखोल चर्चा झाली. आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभाव, बदलत्या प्रेक्षकवर्गाची संवेदना, ग्रामीण-शहरी नाट्यसंस्कृती, नाट्यलेखनातील नवे प्रयोग आणि भविष्यातील मराठी रंगभूमीच्या शक्यता यांचा ऊहापोह करण्यात आला. समारोपाच्या सत्रात सतीश आळेकर यांचे नाट्यवाचन झाले आणि सुमित लांडे यांनी आभार मानले.

कार्यक्रमाची माहिती

कार्यक्रमाचे नाव :नव्वदोत्तरी नाटक : आशय आणि रूप

कार्यक्रमाचा प्रकार: दोन दिवसीय नाट्यपरिसंवाद / चर्चासत्र

आयोजक :साहित्य अकादमी आणि शब्दालय प्रकाशन

दिनांक: 1 व 2 जुलै 2022

स्थळ :श्रीरामपूर

उद्घाटक: सतीश आळेकर

अध्यक्ष :रंगनाथ पठारे

बीजभाषण: दत्ता भगत

बीजभाषण वाचन दत्ता पाटील

प्रमुख सहभाग राजन गवस, सुमती लांडे, प्रेमानंद गज्वी, नीळकंठ कदम, स्वागत थोरात, सचिन शिंदे, प्रवीण भोळे, रमेश भोळे, गिरीश पतके, प्रवीण काळोखे, प्राजक्त देशमुख, प्रतिक पुरी, रमेश रावळकर, दत्ता पाटील

मुख्य विषय: नव्वदोत्तरी मराठी नाटक, नाट्यसादरीकरण, बदलते आशय, नाट्यभान, नाट्यपरंपरा, ग्रामीण-शहरी रंगभूमी

समारोप सतीश आळेकर यांचे नाट्यवाचन

आभार सुमित लांडे

कार्यक्रमाचे महत्त्व गेल्या तीन दशकांतील सामाजिक, सांस्कृतिक आणि तांत्रिक बदलांच्या पार्श्वभूमीवर मराठी रंगभूमीचा सखोल अभ्यास करणारा महत्त्वपूर्ण परिसंवाद

A two-day theatre symposium titled “Post-1990 Marathi Theatre: Content and Form” was jointly organised by Sahitya Akademi and Shabdalaya Prakashan in Shrirampur on 1 and 2 July 2022. The symposium examined how the last three decades of globalisation, liberalisation, privatisation, political and social change, changing family structures and individual-centred lifestyles have influenced the themes, form and performance of Marathi theatre.

The event was inaugurated by senior playwright Satish Alekar, with noted writer and Sahitya Akademi Marathi Advisory Board convener Ranganath Pathare presiding over the opening session. Writer and scholar Datta Bhagat provided the keynote framework for the discussion. Distinguished participants included Rajan Gavas, Sumati Lande, Premanand Gajvi, Neelkanth Kadam, Swagat Thorat, Sachin Shinde, Pravin Bhole, Ramesh Bhole, Girish Patke, Pravin Kalokhe, Prajakta Deshmukh, Pratik Puri, Ramesh Rawalkar and Datta Patil.

Event Information

Event Name: Post-1990 Marathi Theatre: Content and Form

(नव्वदोत्तरी नाटक : आशय आणि रूप)

Event Type: Two-Day Theatre Symposium / Seminar

Organisers: Sahitya Akademi and Shabdalaya Prakashan

Dates: 1st and 2nd July 2022

Venue: Shrirampur

Inaugurator: Satish Alekar

President / Chair: Ranganath Pathare

Keynote Address: Datta Bhagat

Keynote Reading: Datta Patil

Key Participants: Rajan Gavas, Sumati Lande, Premanand Gajvi, Nilkanth Kadam, Swagat Thorat, Sachin Shinde, Pravin Bhole, Ramesh Bhole, Girish Patke, Pravin Kalokhe, Prajakta Deshmukh, Pratik Puri, Ramesh Rawalkar, Datta Patil

Main Themes: Post-1990 Marathi theatre, theatrical performance, changing themes and content, evolving theatre sensibilities, dramatic traditions, and rural–urban theatre practices.

Concluding Session: Dramatic reading by Satish Alekar

Vote of Thanks: Sumit Lande

Significance of the Event:

This was an important symposium that offered an in-depth study of Marathi theatre in the context of the major social, cultural, and technological changes that have taken place over the last three decades. The discussions focused on how Marathi drama, performance practices, themes, theatrical awareness, and stage traditions have evolved in response to changing times.

The sessions explored performance practices, changing themes and social positions in post-1990 plays, theatre consciousness, regional theatre movements, and the relationship between Marathi theatrical tradition and contemporary drama. The symposium highlighted how changing technology, visual culture, rural and urban experiences, and new modes of storytelling continue to reshape Marathi theatre. The programme concluded with a dramatic reading by Satish Alekar.

शेअर कराShare

संबंधित घडामोडीRelated stories

उपक्रम Activity

सी. डी. जैन महाविद्यालयाच्या बीसीए व एमसीए विद्यार्थ्यांची शब्दालयला भेट

सी. डी. जैन कॉलेज ऑफ कॉमर्सच्या बीसीए व एमसीए विद्यार्थ्यांनी आणि प्राध्यापकांनी श्रीरामपूर येथील शब्दालयला भेट देऊन मराठी साहित्य, आत्मचरित्रे, कथा…

C. D. Jain College BCA and MCA Students Visit Shabdalaya, Shrirampur

BCA and MCA students and faculty from C. D. Jain College of Commerce visited Shabdalaya in Shrirampur to explore Marathi literature, stories…

Shabdalaya Prakashan, Ranjankhol, Rahata Taluka, Ahilyanagar

उपक्रम Activity

शालेय विद्यार्थ्यांसाठी शब्दालयचे ज्ञानवर्धक पुस्तक प्रदर्शन

विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण करण्यासाठी शब्दालयने शाळेत बालपुस्तके, कथापुस्तके, स्वच्छता व आरोग्यविषयक पुस्तके आणि सामान्यज्ञानाच्या…

Shabdalay Organises an Educational Book Exhibition for School Students

To encourage reading among students, Shabdalay organised a school book exhibition featuring children’s books, storybooks, cleanliness and hygiene…

प्रकाशन सोहळा Book launch

‘माझं घर’ आणि ‘अधांतर अंधारात’

जयंत पवार यांचे ‘माझं घर’ हे नाटक आणि डॉ. मेघा केळूसकर यांचा ‘अधांतर अंधारात’ हा कवितासंग्रह — दोन्हींचे प्रकाशन बॅ. नाथ पै सेवांगण, मालवण येथे…

‘Majha Ghar’ and ‘Adhantar Andharat’ Launched in Malvan

Jayant Pawar’s play and Dr. Megha Keluskar’s poetry collection were released together by Rangnath Pathare at Barrister Nath Pai Sevangan, Malvan, on…

Barrister Nath Pai Sevangan, Malvan (बॅ. नाथ पै सेवांगण, माल

सर्व कार्यक्रमAll Events पुस्तके पाहाBrowse the books