Description

सारंगांच्या प्रस्तुत संग्रहात ज्या एकोणिस कथा आहेत त्या त्यांनी गेल्या दोन दशकांत लिहिलेल्या आहेत. म्हणजे सरासरी वर्षाला एक कथा झाली. कथा हा वाङ्मयप्रकारच बिनमहत्त्वाचा आणि सवंग ठरवणरांना सारंग हे बाजारू रंजकतेला बळी गेलेले बहप्रसव लोकप्रिय मराठी लेखक आहेत असे म्हणणे अवघड जाईल. सारंगांच्या ह्या सर्व कथा मराठी कथाकादंबरीच्या प्रतिनिधिक अनुकृतीवादी / वास्तववादी / स्वाभाविक चित्रणवादी धाटणीला मूळातून छेद देणाऱ्या आहेत. सुबोध त्याविषयी अस्वस्थ करणारे प्रश्न उभे करणाऱ्या त्या कृती आहेत. त्यांच्यातील चत्मकृती ही निव्वळ कल्पना विलास नाही किंवा लेखकाची मनोविकृती नाही. प्रकृती आणि विकृती यांच्यातल्या जुजबी सीमारेषा सारंगामधला कलावंततत्ववेत्ता पुसून टाकतो आणि मानवी अस्तित्वाविषयी आपण सर्वांनी प्रयत्नपूर्वक दडपलेले भय आणि आश्चर्य पुन्हा जागृत करतो.

Additional information

Book Author