Description
प्रा. लक्ष्मणराव सरदेसाई यांची कथा : एक शोध ‘
या समीक्षाग्रंथाला गोमंतक अकादमीचा साहित्यपुरस्कार प्राप्त लेखक.
डॉ. बालकृष्णजी कानोळकर जन्मभूमी : वायडोंगर- पार्से, पेडणे, गोवा
अभ्यास क्षेत्रे :
* भारतविद्या (Indology) आणि गोमंतविद्या (Goalogy) व तौलनिक संस्कृति – अभ्यास ही विशेष अभ्यास क्षेत्रे
* इतिहास, समाज-संस्कृती, साहित्य व कला या क्षेत्रात संशोधन.
* लोकधर्म, लोकसमाज, लोकसंस्कृती, लोकवाङ्मय, लोककला व लोकनाट्य ही विशेष अभ्यासाची आणि संशोधनाची क्षेत्रे.
* समाज-भाषाविज्ञान (Sociolinguistic) व मानववंश भाषाविज्ञान (Ethnolinguistics) हे विशेष आवडीचे अभ्यास विषय.
* स्वतंत्र प्रतिभेचे समीक्षक संशोधक म्हणून परिचित.
* एम.ए. (इतिहास), एम.ए., पीएच.डी. (मराठी)
* बी.एड्., डी.एड्., कोंकणी शिक्षकसनद व पोर्तुगीज भाषा प्रमाणपत्र अभ्यासक्रम. * शिक्षक म्हणून गेली बेचाळीस वर्षे शिक्षणक्षेत्रात कार्यरत.
* बहुभाषाकोविद.
* मराठी, कोंकणी, हिंदी व इंग्रजीतून साहित्यनिर्मिती.
* कथा, कविता, नाटक, एकांकिका, ललित, प्रबंध व समीक्षा लेखन.
* साहित्य, कला आणि नाट्य यांत विशेष रुची.
* साहित्य आणि नाट्यकला क्षेत्रात अनेक पुरस्कार प्राप्त.
* साहित्य आणि कला क्षेत्रात Resource Person म्हणून मान्यता.
महत्त्वाची प्रकाशने
* प्रा. लक्ष्मणराव सरदेसाई यांची कथा एक शोध.
* क्ष: समिक्षेतलो. (कोंकणी)
* प्रा. लक्ष्मणराव सरदेसाय : जिवित आनी कार्य. (कोंकणी)
* गोमंतकीय साहित्यातील शोधस्थळे.
* गोमंतकीय मराठी वाङ्मयाचा इतिहास, खंड पहिला – (सहलेखन) * मुक्तिपूर्व गोमंतकीय मराठी कथेचा संक्षिप्त इतिहास.
* त्रिकोणाची चौथी मिती.
* गोमंत नवप्रभात.
* कविता समजून घेताना…
* अपरांतक – प्रा. लक्ष्मणराव सरदेसाई विशेषांक – (संपादन). * अपरांतक – बाकीबाब बोरकर विशेषांक – (संपादन). अपरांतक – कविताव्रती शंकर रामाणी विशेषांक – (संपादन).