Description
अंकांच्या भाऊगर्दीत ग्राउंड रिपोर्ट ही अक्षरलिपीची कायमच लक्षवेधी ओळख राहिलीय. यंदाही राज्याचा भुगोल तुडवत सीमा ओलांडून केलेले दमदार ग्राऊंड रिपोर्ट्सही वाचायला मिळतील.
कथाविभागातल्या प्रयोगशील कथा नवा अनुभव देतील. एका नव्याताज्या लेखकाच्या आगामी कादंबरीतला तुकडा, सोबत एका आगामी अनुवादित कादंबरीचा अंशही अंकात आहे. नॉस्टॅल्जिक करणारं ललित, सोबतच प्रवाही व्यक्तिचित्रानं अंकाच्या सौंदर्यात चार चांद लावलेत.
जगण्याचा तळ शोधणाऱ्या रचनांनी सजलेला कविताविभाग आहेच! अंकाचं संपादन केलंय महेंद्र मुंजाळ, शर्मिष्ठा भोसले, प्रतीक पुरी आणि मदन वाघमारे यांनी. मुखपृष्ठ आहे अन्वर हुसेन यांचं.
Reviews
There are no reviews yet.