Description

‘भाषिक कौशल्ये : संकल्पना व स्वरूप’ हे पुस्तक सर्य विद्याशाखेतील विद्यार्थी, शिक्षक, पालक, संशोधक आणि अभ्यासक यांना अत्यंत उपयुक्त ठरेल, असा मला पूर्ण विश्वास आहे. नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० ला केंद्रस्थानी ठेवून हे पुस्तक लिहिले गेले आहे, याबद्दल लेखकाचे विशेष कौतुक. आज दैनंदिन जीवन आणि व्यावसायिक जगतात भाषिक कौशल्यांचे महत्त्व अतुलनीय आहे. जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात उपयुक्त ठरणाऱ्या श्रवण, भाषण, वाचन, लेखन, मुलाखत आणि निवेदन या विविध कौशल्यांची सखोल माहिती या पुस्तकात दिलेली आहे. मला खात्री आहे की, हे पुस्तक सर्व स्तरांतील वाचक आणि अभ्यासक यांचे समाधान करेल. तसेच भाषिक कौशल्यांचा विकास करण्यास निश्चितच मदत करेल. लेखक डॉ. आबासाहेब सरवदे यांना पुढील लेखनासाठी मनःपूर्वक शुभेच्छा आणि सदिच्छा!

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “Bhashik Kaushlya : Sankalpana va Swarup | भाषिक कौशल्ये : संकल्पना व स्वरूप”

Your email address will not be published. Required fields are marked *