Availability: In Stock

CHAKORI PALIKADACHA | चाकोरी पलीकडचा

350.00

ISBN:9788197376689

PAGES:199

PUBLICATION DATE :1/1/2024

LANGUAGE:MARATHI

AUTHOR NAME:SHRIDHAR AMBHORE

Already sold: 0/20
Category:

Description

आठवण केली किंवा झाली की पेशी पेशीत लपलेला झरा झुळझुळतो आणि कितीतरी वर्षाचा जन्मबीज असलेला भूतकाळ जिवंत होतो. शरीर मग आतल्याआत अभयारण्याचं रूप धारण करतं. बुद्ध म्हणतो शरीरात आभाळ आहे. समुद्र आहे. नदी आहे. जे जे निसर्गात आहे ते ते सर्व आहे. प्रामाणिकपणा जागृत असला की सभोवलताचा निसर्ग आणि आतला निसर्ग एक होतो. आनंदोत्सव कसा असतो त्याचा अनुभव घेत राहायचं. देत राहायचं.

रानातली अंगणातली पाखरं पाहिली की तुम्ही लिहिलेलं अनुभवाचं निसर्ग लिखाण नजरे समोर येतं. हा दृष्टांत समृद्ध करतो, खऱ्या अर्थानं जगण्याला सत्त्व देतो. त्यातील निर्मलता निरागसता अधिक उजागर होते. जी माणसं निसर्गावर प्रेम करतात त्यांनाच माणसांचा करूणामयी ममतेचा लळा असतो. तुमच्या अवती भोवती असणारा सततचा विद्यार्थी मेळा त्यांना परिवर्तनीय असं काहीसं मिळत गेलं आणि त्यातील बरीचशी चांगल्या आयुष्याला बांधल्या गेलीत. किती अप्रतिम जीवनाचं सौंदर्यशास्त्र आहे हे.

जिथे जिथे पाणथळीच्या गच्च झाडोऱ्याच्या जागा असतात, आहेत तिथे तिथे रानपाखरं मुक्कामी असतात. त्या ठिकाणी सकाळी पहाटे अनु सायंकाळी होणाऱ्या किलबिलाटांचा अर्थ बौद्ध वाङ्मयात जातक कथात फार अर्थपूर्णतेने सांगितला आहे.

भंडारा जिल्ह्यातील नवेगावबांध नागझिरा ह्या ठिकाणी नोव्हेंबर ते मार्चमध्ये जगाच्या बऱ्याच भागातून शेकडो लाखो पाखरं येतात. महामेळावाच असतो तो. तेथील जे दृष्य असते त्याला साऱ्या उपमा अलंकार थिटे पडतात. पहाटे पहाटे होणारा जो किलबिलाट असतो तो उगवणाऱ्या सूर्यासाठी प्रार्थना म्हणून असतो. सर्व सजीवांना उर्जा देण्याविषयीचा भाव असतो त्यात, तर सायंकाळचा किलबिलाट हा अंधारासाठी असतो. सूर्याला ताजा तवाना करून परत पाठवण्याची आर्जवी वंदना करतात. आंतरिक संवेदना, सद्भाव प्रामाणिक असेल तर निसर्गातील उर्जेशी मैत्री सहज होते. कारण प्रत्येक घटकात जीव असतो. हे बुद्धाचं तत्त्वज्ञान सहज अनुभवाला येते.

बुद्ध म्हणतो,

निसर्ग, अभयारण्य, माणूसप्राण्याला आणि समस्त सजीवाला सभ्यता शिकवतो. सर या सूत्राचे, तत्त्वाचे तुम्ही पाईक आहात.