Description
केशवसुतांनी ‘मजुराच्या मुलावर उपासमारीची पाळी’ या विषयावर गद्यांतच निबंध लिहिला असता तर पुढं कुसुमावती देशपांडे किंवा दि. के. बेडेकरांना कविता म्हणजे काय हे कळायला अडचण पडली नसती….
बालकवींच्या काकडीच्या सँडविचांपासून माधव ज्युलियनांच्या मोगलाई बिर्याणीपर्यंत मराठी कवितेत जणूं काय हाटेलंच चालवली गेली…..
इंग्रजी काव्यावर पाल्हाळिक कीर्तनं करणारे कॉलेजांतले हरदासी प्रोफेसर समीक्षक म्हणवून घेऊं लागले…..
कोंकणांतल्या भुताखेतांचा कोश करायचं अजून कोणी मनावर घेतलंय का? वाङ्मयीन कोशांतल्या कोंकणांतल्या लेखकांवरच्या नोंदींपेक्षां असला कोश नक्कींच वाचनीय ठरेल….
व्यंकटेश माडगुळकरांना ‘ग्रामीण’ ठरवल्यामुळं ‘बनगरवाडी’च्या सामर्थ्याचा कांहींहि उलगडा होणार नाहीं याची कल्पनासुद्धां कोणाला येत नाहीं….