Description

मराठीतले समकालीन प्रतिष्ठित कादंबरीकार रंगनाथ पठारे यांच्या नव्या-जुन्या दीर्घकथांचा हा संग्रह. माणसा-माणसातील स्त्रीपुरुषांमधील विविध नाती, मानवी प्रवृत्ती, आदिमता आणि संस्कार यांचा तळाशी जाऊन घेतला जाणारा वेध आणि शोध हे पठारे यांच्या एकूण लेखनाचे वैशिष्ट्य; त्याची जाणीव या कथा वाचतानाही होते. कथेचे अनेक आयाम, तिचे बहुपेडीपण यांचे दर्शन या कथांमधून होतेच आणि मानवी अस्तित्वाच्या वेदना, सत्तेच्या आकांक्षेतून मानवी जीवनाचे होणारे विरुपीकरण यांचेही प्रत्यंतर येते. या संग्रहातील ‘चोखोबाच्या पाठी’, ‘चित्रमय चतकोर’ या कथा समकालीन श्रेष्ठ मराठी कथेत समाविष्ट होण्याच्या योग्यतेच्या आहेत.

Additional information

Book Author