Description
‘डॉक्टर कंडिशन बॅड आहे पण पोट मात्र गुडगुड करतंय.’ ‘डॉक्टर हा सायकॉलॉजीकली सायको झालाय.’ ‘डॉक्टर, माझं लघवीचं बिघडलंय, पूर्वीपेक्षा जास्त पातळ होतंय.’ अशी भन्नाट वाक्ये ऐकत मी माझ्या वैद्यकीय व्यवसायाची वीस वर्षे पूर्ण केली. विनोदी कान आणि विडंबण करणारे मन, ही कला मिळालेली वडिलोपार्जित संपत्ती.कित्येक पिढ्या आमच्या जमिनीचा सातबारा क्षेत्राच्या बाबतीत कोराच आहे पण विनोद आणि विडंबणाचं गाठोडं कित्येक पिढ्या जपून ठेवत, समृद्ध करत पुढच्या पिढीला हस्तांतरीत करीत आलो आहोत. अगदी आमच्या चिरंजीवांपर्यंत…