Description

स्वतःच्या वाटेनं धीटपणे पावलं टाकीत चालू पाहणारी कविता..

ओंजळीतून निसटून गेलेल्या वाळूच्या मऊ – मुलायम स्पर्शाची ही कविता.

तृप्तपणे मेलेली माणसं आठवताना भोवतीच्या कोलाहलात तडफणारी

माणुसकी उजागर करणारी ही कविता.

कोणत्याही आविर्भावाशिवाय अनुभवाला पकडू पाहणारी,

रम्य बालपणात बागडू पाहणारी ही कविता.

घातपाती दिवसातून उगवलेली आणि भ्रमिष्ट ऋतूत फुललेली ही कविता.

‘ई-मेल छातीशी धरून रडता येत नाही’ म्हणून हळहळणारी ही कविता.

मनातून कागदावर उतरलेली आणि पुन्हा कागदावरून

मनात शिरू पाहणारी ही कविता.

–  दासू वैद्य