Description
मगगनजाई’ असे सुंदर शीर्षक असलेला हा कथासंग्रह… एकेक कथा वाचत गेलं की लक्षात येते, या कथा सांप्रत काळाचे दर्शन घडविणाऱ्या आहेत. वर्तमानाचे प्रश्न आणि त्याची उत्तरे या कथांमध्ये सापडतात. आनंद, दुःख, वेदना, असूया, अविश्वास, या स्वभाव रंगाचे दर्शन आपल्याला घडते.
‘गगनजाई’ ही यातील शीर्षक कथा. आयुष्याचा बेरंग झाल्यानंतर पुन्हा जीवनात सुगंध भरुन घेता येतो, हे सांगणारी ही सुंदर कथा. तर ‘क्षमा रघुपति वाचून माणूस अस्वस्थ झाल्या शिवाय रहात नाही. ‘ खंडू शेठ ‘ वाचताना उन्नत प्रेमाची प्रचिती येते. झोपाळयाशी नातं किती मधुर असावे, हे खरे तर कथा वाचल्याशिवाय समजणारच नाही.
‘कथा’ हा वाङ्ममयातील अतिशय प्राचीन असा साहित्य प्रकार आहे. कथा, कहाण्या, आख्याने यातूनच आपल्या संस्कृतीचे वहन पीढी दर पिढी होत असते. एका अर्थाने कथा या सांस्कृतिवाहक असतात.म्हणूनच आजच्या काळात कथासंग्रहाचे महत्व आहे. अनेक स्वभावरंग असलेलं, तितकंच नाजूक, मखमली अन् सुगंधी असे ‘गगनजाई’ चे हे भावपुष्प लेखिकेने वेगवेगळ्या कथांची सुंदर गुंफण करून रेखिले आहे. यातील कथा, त्यांचे विषय आधुनिक जीवनावर भाष्य करतात. नवविचारांचा स्वीकार करणे किती महत्त्वाचे आहे, हे सांगण्याचे उत्तम कसब आणि समाजभान असलेल्या ज्येष्ठ लेखिका आशा पैठणे यांनी आत्मकथन, कविता, ललित गद्य, बाल साहित्य अशा विविध प्रकारचे लेखन केले असल्यामुळे अनुभवी आणि विचक्षण लेखनवृत्तीची छाप या पुस्तकात अनुभवास येते.
Reviews
There are no reviews yet.