Description
पिढ्यान् पिढ्यांपासून लहान मुलांबरोबर प्रौढांनाही भुरळ घालणाऱ्या इसापाच्या जगप्रसिद्ध नीतिकथांना सौ. उषा परब यांनी बालगीतांच्या रुपात या संग्रहात सादर केले आहे. गोष्ट, काव्य आणि बोधपर तात्पर्य अशा तिपेडी गुणविशेषांनी ही बालगीते समृद्ध आहेत. मराठीतील बालवाङ्मयाच्या वैशिष्ट्यपूर्ण परंपरेत चपलखपणे सामावून जाणारी आणि ही परंपरा भरीवपणे पुढे नेणारी अशीच ही बालगीते आहेत. बालमानस लक्षात घेऊन त्यानुसार केलेली पद्मबंधाची रचना, सोपी व आकलनसुलभ शब्दकळा, प्रासादिकता व गेयता यांसारख्या वैशिष्ट्यांमुळे या काव्यरचना मनाचा सहज ठाव घेतात. संस्कारक्षमता, सादरीकरणाला अनुकूल ठरेल अशी नाट्यमयता, मूल्यशिक्षणाला पूरक कथाकाव्य विषय यांमुळेही या संग्रहाची उपयुक्तता वाढली आहे. प्रत्येक संवेदनशील वाचकाबरोबरच पालक, शिक्षक व साहित्यप्रेमींनी आवर्जून आपल्या मुलांना वाचावयास द्यावे, इतके या बालगीतांचे मोल अनमोल निश्चितच आहे.