Description

आहे माहीत मला

कितीही बदलला गियर

नाही जाता येणार रिव्हर्स

युगाच्या जुन्या चिवट जखमांवर

येणार नाही लावता मलम

कदाचित जोडताही नाही येणार

हातातून सुटून गेलेल्या

काळाची नाजूक भिंगरी

घेतलंय स्टेअरिंग हाती

कालचक्रच आहे हे

आता पुढचा काळ माझा

ज्यांनी केले कालबाह्य

लोटून दिले काळ्या गर्तेत

काळाशी जुळवू दिलीच नाही पावले

काळाची येऊ दिलीच नाही दृष्टी

त्यांना विचारणार आहे जाब

देणार करारा जवाब