Description

. हारणे निघाली. पळत निघाली. तीरासारखी निघाली. आता हा ती कुठे जाणार होता आणि कोणत्या रस्त्याला लागणार होता, हे तिला कुठे माहीत होते? तेवढा विचार करायला वेळच कुठे होता ? जिवाच्या कराराने पळत राहणे एवढी एकच एक गोष्ट ती सर्वांगाने करीत होती…. हारणचे पुढे काय होणार ? वेगळे असे तिचे काय होणार आहे ? उद्या कदाचित ती कोणाची आवडती पत्नी होईल, माता होईल. ‘स्त्री क्षणकालाची पत्नी व अनंतकालाची माता असते,’ ह्या सुभाषितात अभिप्रेत असलेली पूज्य माता होण्याचे ती नाकारील, कारण ती थोडी वेगळी स्त्री आहे. ती एक कणखर, सहजी मोडून न पडणारी स्त्री आहे. चंगीजखानापासून अर्वाचीन अधम, आक्रमक पुरुषांच्या सगळ्या कारवायांना पचवीत राहून स्वतःचे स्वत्व टिकवत राहिलेल्या स्त्रीत्वाचा धागा तिच्यात आलेला आहे. सगळे हलाहल पचवून उभे राहण्याची असाधारण क्षमता व्यापक अर्थाने स्त्रियांत नेहमी असते. एखाद्या क्षणी पाताळात जाण्याची कामना वैतागून तिनं व्यक्त केली असली, तरी ती तिथे जाणार नाही. अंगावर येईल, ते झेलत व त्याखाली चिणले न जाता आपले स्वत्व जपत जगणे व आपल्या अस्तित्वाचे अपरिहार्य उन्मेष प्रकट करीत राहणे यात स्त्रीचे जे सनातन प्रौढ समंजसपण असते, ते तिच्यात आहे…..

Additional information

Book Author