Description
त्यांची पहिली कविता “हरी काई वाली झील १९८६ मध्ये प्रकाशित झाली होती, “बसंत खोजती चिडिया” हा त्यांचा कविता संग्रह राधाकृष्ण प्रकाशनातून २००६ मध्ये प्रकाशित झाला होता. ते अल्पशः पण सतत लिहित आहेत. त्यांच्या कविता “पहल”, “तद्भव”, “वर्तमान साहित्य”, “कथा” इत्यादी पत्रिकामध्ये प्रकाशित झाल्या आहेत. अलीकडेच त्यांचा नवा हिंदी कविता संग्रह “इसलिए बची हुई है पृथ्वी अब तक” सेतू प्रकाशन द्वारे प्रकाशित झाला आहे.१९९२ पासून त्यांनी मराठीत कविता लिहायला सुरुवात केली. पहिली कविता “एश टी : एक ग्रामगीत” ही अमळनेर येथील त्यांच्या ग्रामीण भागातील अनुभवांवर आधारित आहे. त्यांच्या सुरुवातीच्या कविता विडंबन आणि व्यंगचित्राच्या होत्या, पण नंतर त्या हळूहळू गंभीर सामाजिक आशयाच्या दिसून येतात. आपल्या समृद्ध प्रादेशिक प्रशासकीय अनुभवातून त्यांनी अनेक कवितांचे विषय घेतले आहेत.
अनूप कुमार हे एक सांस्कृतिक आयोजक देखील आहेत. नागपूर विभागीय आयुक्त म्हणून त्यांनी २०१४ ते २०१८ अशी सलग चार वर्षे राष्ट्रीय स्तरावरील शास्त्रीय संगीत आणि नृत्याचे “कालिदास समरोह “चे यशस्वी आयोजन केले. २०११ मध्ये त्यांनी दिल्ली, नागपूर आणि पुणे येथील काव्य परिसंवादात कविता वाचन केले आहे, त्यांना सार्क देशांच्या सांस्कृतिक परिषदेत समकालीन भारतीय कविर्ताचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली. ते हिंदी व मराठी साहित्याच्या चळवळमध्ये समरुपात सहभागी आहेत.