Description

कै. जिजी यांचे चरित्र चित्रण करून सौ. लीला जंजिरे यांनी एक फार महत्त्वाचा सामाजिक व सांस्कृतिक दस्तऐवज सिद्ध केला आहे. त्यात शेतकरी घरातल्या एका सामान्य स्त्रीतील असामान्य गुणांचे चित्रण आहे. हे एका असाधारण स्त्रीचे चरित्र- चित्रण आहे. म्हणूनच ते फक्त एका मराठा स्त्रीचे चित्रण उरत नाही. ते कोणत्याही स्त्रीच्या जिजीविषेचा स्वर होऊन जातो. या लेखनाने मराठी साहित्यात एक मोलाची भर घातली आहे. असे मी ठामपणे म्हणेन. स्वतःच्या वयाच्या पासष्टीच्या आसपास असताना सौ. जंजिरे यांनी पहिल्यांदाच असे लेखन केले आहे. त्यांनी अधिक लिहावे असे मी खात्रीने म्हणेन, त्यासाठी त्यांना माझ्या अंत:करणापासून शुभेच्छा..