Description
या पुस्तकात मी अलीकडच्या काळात केलेली काही भाषणे, लेख, एक-दोन प्रस्तावना, काही टिपणे, मुलाखती असे एकत्र केलेले आहे. काही समान मुद्दे; पुन्हा पुन्हा आलेले. तसेच ठेवले आहे. यातून मी माझ्या काळाकडे, त्यातील प्रश्नांकडे कसा पाहतो, त्यांच्या सोडवणुकीचे कोणते रस्ते मला दिसतात, यांचे दिग्दर्शन होईल असे वाटते. आस्थेचे विषय पुन्हा पुन्हा आल्याने ते मुद्दे जोरकसपणे मांडले जातात, अशी कदाचित जरा जास्त आशादायक भावना/भूमिका आहे. बाकी जोखीम तर नेहमीच असते. ती घ्यावीच लागते. समोरच्याकडून सुसंस्कृत प्रतिसादाची अपेक्षा करायची तर आपणही ती साद त्याच प्रकारे प्रतिपादन करावी, असे मी नेहमीच करत आलो आहे. सुसंस्कृतपणाच्या ज्या हीन पातळीवर एक समाज म्हणून आज आपण जगत आहोत, त्या या काळात अशी जपवणूक मला महत्त्वाची वाटते.
- रंगनाथ पठारे