Description
महेश केळुसकरांतील सहृदय लेखक विदारक सत्य सहजपणे पण झोंबणाऱ्या शैलीत कथन करतो तेव्हा तो वाचकालाही व्याकुळ करतो, अस्वस्थ करतो. मानवी जीवन, त्यातील गुंतागुंत, नात्यातील अनाकलनीय संबंध, सर्वसामान्य माणसाच्या जगण्यातील टप्पे, त्यांचे अन्वयार्थ लेखकाला चांगले उमगलेले असल्यामुळे त्याने लिहिलेल्या कथा वास्तव आणि प्रत्ययकारी वाटतात. केळुसकरांच्या कथांमधली माणसे तुमच्या आमच्या अवती-भवती भेटणारी सर्वसामान्य माणसे आहेत. त्यांची सुख-दुःखेही सर्वसामान्यांची आहेत. पण त्या सगळ्यामागे एक अथांग कारुण्य, खोल समजुतदारपणा, टोकाचा सोशिकपणा आणि माणसातील जनावराची अमानुष वृत्ती असे रसायन आहे. कविता, कथा, कादंबरी, आणि विनोद आदी वाङ्मय प्रकार हाताळताना केळुसकर जी प्रयोगशीलता प्रगट करतात, तिच्यामुळे त्यांचा आविष्कार ताजा, टवटवीत राहतो. निर्मितीमधील पृथगात्मता हे कोणत्याही लेखकाचे बळ असते. केळुसकरांपाशी हे बळ आहेच.
– मधु मंगेश कर्णिक








Reviews
There are no reviews yet.