Description
कथालेखक मधुकर धर्मापुरीकर यांची प्रकृती मुळात गोष्ट सांगायची. त्यांची स्वत:ची कथा असो, त्यांनी केलेले कथेचे अनुवाद, कथेबद्दलचे त्यांचे लेखन किंवा अन्य लेखनसुद्धा, या सगळ्यातून झुळझुळणारे छान असे एक गोष्टीरूप प्रवाहित झालेले असते.
प्रांजळपणा, नर्मविनोद आणि अनोखे अनुभव यामुळे त्यांच्या लेखनाचे हे गोष्टीरूप रुचकर होत असते. आपल्या कथेतल्या नायिकांबद्दल धर्मापुरीकरांनी सांगितलेल्या, प्रस्तुत संग्रहातल्या हकिकती वाचताना मूळ कथेबद्दल कुतूहल तर वाटतेच, पण त्या कथेशिवाय हे लेखन परिपूर्ण आहे, हेही लक्षात येते. अशी दुहेरी किमया धर्मापुरीकर यांनी इथे साधली आहे.
… धर्मापुरीकरांच्याच शब्दांत सांगायचे झाल्यास, त्यांच्या कथेतल्या या नायिका कथेतला मेकप उतरवून मोकळेपणाने इथे भेटतात.