Description

एका माणसाने दुसऱ्याच्या पोटात चाकू खुपसला आणि म्हणाला, “हा घे चाकू, तूसुद्धा कोणालातरी भोसक.” दुसऱ्या माणसाने चाकू घेतला आणि तिसऱ्याच्या पोटात खुपसला. परंपरेला जागत दुसऱ्या माणसाने तिसऱ्याला चाकूही देऊन टाकला ; म्हणजे त्याच्याबाबतीत जे घडलं होतं ते तो तिसरा चौथ्याशीही करेल. आता संपूर्ण देशाच्या पोटात चाकूचा घाव आहे आणि सर्वांच्या हातात एक-एक चाकू आहे, जो ते दुसऱ्याच्या पोटात खुपसतायत.

त्यांना कोणी थोपवायला गेलं तर ते म्हणतात, ” हा आमच्या श्रद्धेचा प्रश्न आहे, तुम्ही यात पडू नका, आमच्या भावना दुखावल्या जातात.”

(संग्रहातील कथेमधून)

टाळेबंदी उघडण्याऐवजी पुन्हा लावली जाते तेव्हा आई रडू लागते. “काहीतरी करा,” ती बाबांना सांगते, “खोलीचं भाडंसुद्धा बाकी राहिलंय. केशवकाका बातमी आणतात, वसईहून एक गाडीवाला पैसे घेऊन गावी घेऊन जातोय, भाडं प्रत्येकी तीन हजार. कमीत कमी तीसजण पाहिजेत. बाबा आणि केशवकाका हिशेब करू लागतात. “कपासवाडीत तिकडच्या गावांतले अठरा जण आहेत. बोरिवलीमध्ये दोन नातेवाईक रिक्षा चालवतात. त्यांच्यातलेसुद्धा सात जण यायला तयार आहेत. उरले पाच. ते पण बघूया. नाहीच मिळाले तर आपल्याला प्रत्येकी दीड हजार आणखी काढायला लागतील.” बाबांकडे पैसे कमी आहेत. “पैशांचं तोंड बघू नका, इथून बाहेर पडू या,” आई बाबांना आणि केशवकाकांना सांगते… आई एक दिवस आधी सर्व कपडे एका खोक्यात भरते. भांडी एका गोणीत. चार डबे चाळीतल्या अम्माजवळ. एका थैलीत खाण्याचं सामान. आपण परत केव्हा येणार, मी आईला विचारतो तेव्हा आईला रडू फुटतं. ती म्हणते, “इथे दाणापाणी लिहिलेलं असेल तर येऊ.” मला तर दाणापाणी नसलं तरी परत यायचं आहे.

(संग्रहातील कथेमधून)

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “Kathantara | कथांतरण”

Your email address will not be published. Required fields are marked *