Description
लोकसमूहाच्या भाषा, लकबी, निसर्ग, प्राणी, पक्षी, कीटकांच्या जगण्याचे नियमांच्या सहसंबंधाचे इथे दर्शन घडते. निसर्गनियमांना तोडून वेगळं जगण्याची माणसाची धडपड कशी चुकीची आहे, हे दाखवून देते. प्रत्येकाचं जगण्याचं स्वातंत्र्य हे महत्त्वाचे आहे. तो जपणे हाच मानवधर्म आहे, हे सूत्र लेखकांनी उत्तमप्रकारे उलगडून दाखविले आहे.छोट्या छोट्या ओळी, बोली भाषेचा उत्तम वापर, प्रसंग नेटकेपणाने उभे करणे ह्यामुळे वाचनीयता वाढली आहे. घेण्यापेक्षा देण्यातला आनंद सर्वश्रेष्ठ आहे, हे या बालसाहित्याचे मुख्यसूत्र मुलांना नक्की आवडणार. मराठी बालसाहित्यातील लेखकांचे पदार्पण आणि वेगळेपण बालवाचकांना नक्की आवडेल. लेखकांना पुढील बालसाहित्य लेखनासाठी शुभेच्छा !